LOADING ...

About

We are a team of certified psychology professionals with experience and expertise in psychometric testing, counseling, guidance and training.

बऱ्याचदा मी Mental health related profession मध्ये काम करते असं सांगितलं की विविध प्रतिक्रिया बघायला मिळतात. Hmmm .... छानच , आजकाल गरज आहे ... लोकं येतात का तुझ्याकडे ... लहान मुलांचे पण प्रश्न असतात का ? आणि मग त्यांचे आईवडील काय करत असतात ? कुठून कुठे चाललीये ही पिढी ? आमच्यावेळी ना असं काहीच नव्हतं .... वगैरे वगैरे . अशा सर्व प्रतिक्रिया देणाऱ्यांना 'होना' असं इतकंच emphathetic understanding दाखवत मी फारसं न बोलणंच निवडते ... मुळात आधी चा काळात मुलांचे प्रश्न नव्हते आणि attach ते आहेत असा मुळीच नाही. तेव्हा प्रश्न वेगळे होते ते सोडवायचा पद्धती अधिक वेगळ्या होत्या.
आज कालची आर्थिक गरज ओळखुन आणि career संबंधीतील महत्वाकांक्षा लक्षात घेता आई आणि वडील दोघेही working असतात. (ते तसं असणं कसं मुलांसाठी घातक आहे वगैरे वक्तव्य करणं आजच्या काळात अतिशय अनुचितच ठरेल ) मंतांमधील फरक, त्याच शहरातील आजी आजोबांची Availability आणि पालकत्वाच्या
तात्त्विक फरकांमुळे , मुलं शाळा - पाळणाघर (sorry activity centre ) आणि गरज पडली तर थोडा वेळ आजी आजोबां कडे असतं. पुर्ण वेळ त्यांच्या कडे असेल तर हे प्रश्न राहणारच नाहीत असं मुळीच नाही. कारण माझा प्रश्न हा आईबाबांच्या पालकत्वा मधील Engagement संबंधितला आहे. मला भेटणाऱ्या पालकांकडे आई मुलाबरोबर काय करते आणि बाबा मुलासाठी काय करतो ( किंवा करायला हवं ) याची checklist आहे. मी ते visualise करते तेव्हा मला एखाद्या कारखान्याचे चित्र डोळ्या समोर येते. आई दात ब्रश , मग अंघोळ , बाबा डबा आणि Bag भरणे. आई आवरून देणे , बाबा नाश्ता भरणे (mobile बघता बघता पण चालेल ... कारण सकाळी घाई असते ) आणि शेवटी parcel van मधे सोडणे. संध्याकाळ ते रात्री झोपणे पण बऱ्यापैकी हेच चित्र दिसुन येते. Quality time घालवण्यासाठी बागेत किंवा मॉल मध्ये नेतात... अनेकदा पालक विचारतात हे सोडून अजुन काय आता ? या प्रश्नातच खरंतर उत्तर लपलंय..
पालकत्व ही मुलं मोठं होण्यासाठीची Tick mark activity नाही. त्या प्रत्येक मोठं होण्याच्या पायरीवर पालकाची involvement, engagement किती हा प्रश्न महत्वाचा. कारण मुलं काय मोठी होणारच आहे. (तुम्ही प्रयत्न करा अथवा नको ) अगदी जेवण बनवणं ... काय बनवतो ते ... कसं खातो ... अंघोळ करणं .. अंघोळ घालणं ... रमत गमत गाडीवर चक्कर मारुन शाळेत जाणं या सगळ्या गोष्टीतील माझ्या आधीच्या पिढीची involvement अतिशय कौतुकास्पद आहे. स्वयंपाक करताना त्यात घेतलेला रस,आईला भाजी निवडण्यात केलेली मदत. एकत्र किल्ला बनविणे, सणासुदीलाच त्यांच्या बरोबर कपडे खरेदी, पहिली गाडी, वह्यांना covers घालणं. हे सगळं अनुभवल्या बद्दल मला नेहमीच fortunate वाटत आलाय. असे अनुभव संपन्न आईवडील हा जेवत नाही , लवकर कसं झोपवु , mobile च काय करू हे प्रश्न विचारतात तेव्हा खरंच परिस्थिती गंभीर आहे याची जाणीव होते.
राहता राहिला प्रश्न या बाबत मदत घ्यायचा... नको तिथे .. नको तेव्हा समाजाचा आणि समाज काय म्हणेल याचा विचार आपण बऱ्याचदा करतो . मुल तुमचं आहे आणि त्याच्या आजच्या प्रश्नासंबंधित 'आज' मदत घेतलीत तर त्याचा 'उद्या' चांगला असेल. त्याला वयाच्या ४थ्या वर्षी counsellor ची मदत का घायवी लागते हा प्रश्न मोठा की आता त्याचा teenage मध्ये तो कुणालाच बघत नाही हा प्रश्न मोठा हा ज्या त्या पालकांनी घायचा निर्णय आहे. आश्चर्य व्यक्त करणारे , कीव दाखवणारे, नावं ठेवणारे -कुठलीही जबाबदारी न घेता आपापल्या घरी निघून जाणार आहेत. आपलं मुल आपलच आहे त्याचे प्रश्न, अडचणी, समस्या आपण आणि आपणच समजुन घायला हव्या
मुलांचे मानसिक स्वास्थ आणि त्यातील पालकांची, शिक्षकांची अर्थात समाजाची भूमिका यावर अधिक बोलतच राहु... तुमच्या प्रतिक्रिया आणि मते जरुर पोस्ट करा..
#mentalhealthawareness
#psychologyeveryday
#workingforanoblecause
17 likes / 0 comments